गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या पुर्वसंध्येला समुद्रपूर पोलीसांनी केला मोठा देशी व विदेशी दारूसाठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      दिनांक 25/04/2024 रोजी पोलीस स्टेशन समुद्रपूर चे ठाणेदार श्री. संतोष शेगावकर साहेब यांना गोपणीय माहीती मिळाली कि, मौजा निंबा गावात राहणारे शालिक बारस्कर व त्याचा मुलगा वैभव उर्फे गणेश बरस्कर यांनी त्याचे घरी व शेतात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी व विदेशी दारूचासाठा लपवुन ठेवलेला आहे.

अशा मिहीती वरून मा. ठाणेदार साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूर चे डि. बी. पथकाचे प्रमुख पोना / प्रमोद थुल, पोना/ सचिन भालशंकर, पोशि/प्रमोद जाधव यांचे सह जावुन नमुद आरोपीतांवर प्रोरेड कार्यवाही करून आरोपीतांचे घर झडती मध्युन व शेतात लपवुन असलेला देशी व विदेशी दारू साठा 1) रॉयल स्टॉग कंम्पनीच्या 90 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या एणुन 100 शिश्या 2) देशी दारूच्या 90 एम. एल. च्या सिलंबद 1200 शिश्या 3) एक बजाज कम्पनीची 220 पल्सर बिना नंबरची मो. सा. 4) एक गोदरेज कंम्पनीचा फीजर असा जुमला किमत 3,65,000/रू चा माल जप्तकरून नमुद आरोपीतां विरूध्द पो.स्टे. समुद्रपूर येथे अप क. 459/2024 कलम 65 (ई), 77 (अ), 83 मु.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नुरुल हसन सा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. याचे निर्देशाप्रमाणे मा. स.पो.नि. संतोष शेगावकर ठाणेदार पो. स्टे. समुद्रपूर याचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात स.फौ. विक्की मस्के, स. फौ. धर्मेंद्र तोमर, पोलीस नाईक प्रमोद थुल, सचिन भालशर पोलीस अंमलदार प्रमोद जाधव, चापोहवा सचिन वाघमारे यांनी केली कार्यवाही दरम्यान मौजा निंबा येथील पोलीस पाटील भुपती उरकुडे यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये