ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेड राजा येथे आदर्श सखी मतदान केंद्र स्थापन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवड रद्दणुकीच्या अनुषंगाने 05 बुलढाणा लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाच्या तयारीची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे.

24 सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी आज दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी, मा.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात पहिल्यांदाच आदर्श सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 336 मतदान केंद्रे आहेत, दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी आदर्श सखी मतदान केंद्र सज्ज झाले आहे, पंचायत समिती बांधकाम विभाग सिंदखेडराजा येथे हे मतदान केंद्र असून जवळपास 1200 मतदारांची येथे नोंद आहे.

मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी हा नाविन्य प्रयोग करण्यात आला आहे, आदर्श सखी मतदान केंद्रासोबत आदर्श दिव्यांग मतदान केंद्र 1. आदर्श युवक मतदान केंद्र 6 स्थापन केले आहेत.

आदर्श सखी मतदान केंद्राच्या केंद्राध्यक्ष नंदा काळे या आहेत, त्यांच्या सहकारी सखी म्ह्णून कृष्णा ईल्लरकर,सीमा तांबेकर, वर्षा कवाणकर,एस.एम. नागलोत तलाठी,ए.एस. गिरणारे तलाठी,सीमा भुतेकर महिला पोलीस,सविता मेहेत्रे,प्रिया राऊत इत्यादी सखी काम करत आहेत.

मा. तहसीलदार सिंदखेड राजा प्रवीण धानोरकर, मा. तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा मनोज सातव, मा. नायब तहसीलदार डॉ. अस्मा मुजावर, मा. नायब तहसीलदार नितीन बढे,मा. गटविकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश महोर, मा. गटविकास अधिकारी सिंदखेडराजा डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, मा. मुख्याधिकारी सिंदखेडराजा प्रशांत व्हटकर, मा. मुख्याधिकारी देऊळगाव राजा अरुण मोकळ इत्यादी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या मतदान केंद्राला लाभत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये