रेतीतस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसुल विभागाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गौण खणीज पथकाची गस्त सुरु असतांना अवैध रेतितस्करी करीत असलेल्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करीत सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई भद्रावती महसूल विभागाच्या गौण खणीज पथकाद्वारे दिनांक २३ ला बेलगाव रोडवर करण्यात आली.
रेतितस्करी विरोधात महसुल विभागाने मोहीम तिव्र केल्याने तालुक्यातील रेतीतस्करांचे धाबे चांगलेच दणानले आहे. गौण खणीज पथकाची गस्त सुरु असतांना बेलगाव रोडवर एका नंबर प्लेट नसलेल्या ट्रैक्टरच्या सहाय्याने अवैध रेतीवाहतूक होत असताना आढळून आले. त्यांच्याजवळ रेतीच्या परवान्याबद्दल चौकशी केली असता तो आढळून आला नाही. त्यामुळे सदर ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली.
सदर ट्रॅक्टर हे चंदनखेडा येथील गणेश संभाजी नन्नावरे यांच्या मालकीचे आहे. सदर कारवाई गौण खणीज पथकाच्या प्रतीक्षा लोखंडे, प्रियंका शस्त्रगार,सुरज शेंडे यांनी केली.