स्टूडेंट फोरम ग्रुप कोरपनाचे वतीने शैक्षणिक सांस्कृतिक महोत्सव 2023 चे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
स्टुडेंट फोरम ग्रुप कोरपना द्वारा तीन दिवसीय शैक्षणिक व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाचे भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला असुन या कार्यक्रमात नृत्य स्पर्धा,रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्टूडेंट फोरम ग्रुप द्वारा घेण्यात आलेल्या महात्मा फुले शिष्यवृत्ती स्पर्धेचे पारीतोषिक वितरण होणार आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन 22 ला सांय.6 वाजता शुक्रवारी आयोजित असुन कार्यक्रमाचे उदघाटक माननीय आमदार सुभाषजी धोटे,कार्यक्रमचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप, विशेष अतिथि तथा सत्कारमूर्ती विधानपरिषद सदस्य नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले सर प्रमुख अतिथि तथा मार्गदर्शक रणजीत यादव सर आयएएस तहसीलदार कोरपना उपस्थित राहणार आहे तर कोरपना तालुका रत्न व शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान सोहळा व स्पर्धा मार्गदर्शन व बक्षीस वितरण सोहळा चे अध्यक्ष माजी आमदार संजय धोटे प्रमुख उपस्थिती मा.ना.हंसराजजी अहीर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग भारत सरकार देवरादादा भोंगळे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपुर खुशालभाऊ बोंडे सामाजिक कार्यकर्ता राजुरा हे मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्य्रकमात सत्कारमूर्ती शिक्षण महर्षि पुरस्कार 2023 प्राप्त श्री मधुकर उपलेंचीवार सर संस्थापक सचिव तथा अध्यक्ष विद्यार्थी सहायक समिति वरोरा, कोरपना तालुका रत्न पुरस्कार पुरस्कार 2023 प्राप्त स्मिता चिताले मैडम मुख्याध्यापीका तथा प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर,नवनियुक्त नायब तहसीलदार प्रतीक गजाननराव बोरडे, ब्रिटिश सरकार ची चेव्हेनिंग शिष्यवृतत्ती प्राप्त तालुका रत्न एडवोकेट दीपकदादा चटप, स्पर्धापरीक्षाचे प्रमुख मार्गदर्शक सुमित उरकुडकर सर करियर मार्गदर्शक,समाज प्रबोधनकार,वर्धा उपस्थित राहनार असून प्रसंगी नवनियुक्त गुणवंताचा सत्कार सोहळा आयोजित आहे.
स्टूडेंट फोरम ग्रुपचे विद्यार्थी दरवर्षी विद्यार्थीसाठी विविध उपक्रम आयोजीत करत असतात. परिसरातील सर्व नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकानी केले आहे.