ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“अंध विद्यार्थ्यांमधून घडावेत बालकवी.”

प्रसिद्ध साहित्यिक - एकनाथ आव्हाड यांनी केले अंध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने अभिजात दर्जा जाहीर झाल्यानंतर प्रथमच प्रसिद्ध साहित्यिक बालकवी एकनाथ आव्हाड आनंदवनात आले होते.त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकासभाऊ आमटे व पल्लवीताई आमटे यांची भेट घेऊन आनंदवनातील प्रकल्पाबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी राजेश ताजने यांनी ‘आनंदवनाचा विकास ‘हे पुस्तक त्यांना भेट दिले . त्यानंतर त्यांनी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या समोर काव्यांच्या गमती -जमती हा छोटासा कार्यक्रम सादर केला.

    प्राथमिक शिक्षणाच्या स्तरापासूनच विद्यार्थ्यांना त्या भाषेची गोडी लागली तरच भाषेचा विकास होतो. म्हणून आता दिव्यांगाच्या शाळा – शाळांतून अंध विद्यार्थ्यामधून बालकवी घडावेत अशी अपेक्षा साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक एकनाथ आव्हाड मुंबई यांनी अंध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना अपेक्षा व्यक्त केली. आनंद अंध विद्यालय आनंदवन प्रार्थना सभागृहात ‘अंध विद्यार्थ्यांची एक संवाद’ या कार्यक्रमात त्यांनी ‘ कावळा शेवया खातो’ ही कविता वाचून अंध विद्यार्थ्यांचे मन जिंकले. त्याचप्रमाणे डॉ.प्रा. प्रमोद नारायणे यांनी’ प्राण्यांची पार्टी ‘व ‘कार ड्रायव्हिंग’ ही कविता गमती -जमतीने मजेशीर विनोदात्मकरीत्या सादर केल्याने सर्व अंध विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितेवर टाळ्यांचा ताल धरून सभागृहात चैतन्याचे वातावरण निर्माण केले.

यावेळी ग्रंथाली प्रकाशनाचे विश्वस्त मुकेश हिंगलासपूकर मुंबई,जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे,उमेश कदम, ज्येष्ठ कवियित्री बाल साहित्यिक ज्योती कपिले मुंबई, कवितेसाठी वाहिलेले भारतातील अभिनव काव्य पर्यटन स्थळ ‘कवितेचे घर ‘चे संस्थापक श्रीकांत पेटकर, कल्याण किशोर पेटकर नागपूर,अंधशाळेचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आचार्य परमानंद तिराणिक कला शिक्षक यांनी केले. तसेच त्यांनी सर्व पाहुण्यांची ओळख करून दिली.या कार्यक्रमासाठी विशेष शिक्षिका वर्षा उईके,तनुजा सव्वाशेरे, शरयू येलतुरे, अमृता डोंगरे,जितेंद्रचुधरी व अंधशाळेतील शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री भूषण मेडिलवार, शिक्षणमंत्री स्नेहल इवदे सर्व सहकारी मंत्रिमंडळातील सदस्य व संधी निकेतन अपंगाची कर्मशाळेतील सर्व अंध विद्यार्थी यांनी यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये