ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने धीरेंद्र शास्त्री यांचा केला निषेध 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. आपल्या आराध्य दैवताचा अपमान कोणताही शिवप्रेमी सहन करू शकत नाही. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात इतिहासाची मोडतोड करून आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अत्यंत चुकीचे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी, रा. स्व. संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित होते. मात्र सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्याचा विरोध न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली.

काँग्रेस नेते प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ. राहुलभाउ बोंद्रे यांच्या सूचनेनुसार देऊळगाव राजा येथे आज दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी बस स्थानक परिसरात काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी, धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा तसेच भाजप व रा. स्व. संघाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवून निषेध व्यक्त केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, तसेच त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.

या निषेध आंदोलनात,काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अनिल सावजी, तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे, शहर अध्यक्ष अतिश कासारे, माजी नगरसेवक हनीफ शहा, आयुब भाई, मुबारक खान, इरफान भाई, रवीभाऊ इंगळे प्रा अशोक डोईफोडे, समाधान पाबळे, धोंडीराम लंके, नारायण जाधव, बाबासाहेब कोल्हे, तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये