चोरा शेत शिवारातील विहिरीत १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला
अत्याचार करून खून झाल्याचा कुटुंबीयांचा संशय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील चोरा येथील शेत शिवारातील एका विहिरीत एका 14 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सदर घटना दिनांक 21 रोज शुक्रवारला पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वय 14 वर्षीय मुलगी, राहणार चोरा असे या मृत मुलीचे नाव आहे.
सदर घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती इथे आणला. मात्र मृतक मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भद्रावती पोलीस स्टेशनला भेट दिली. या घटनेमुळे काही काळ पोलीस स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शवविच्छेदन अहवालानंतर या घटनेची सत्यता समोर येईल. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार लता वाढिवे यांच्या मार्गदर्शनात गजानन तूपकर, अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुदरी, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, खुशाल कावडे, रोहित चिटगीरे, योगेश घाटोडे भद्रावती पोलीस करीत आहे.