ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगावराजा येथील मुख्य रस्त्यावर पडले जिवघेणे खड्डे

पीडब्लूडीने या गंभीर समस्याकडे तातडीने लक्ष देऊन जिवघेणे खडे तात्काळ बुजवावे अशी मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगावराजा शहरातील जालना कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नदीजवळील विद्दुत वितरण कंपनी च्या कार्यालयासमोर मोठे जिवघेणे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.
या मार्गावरून दिवस रात्र वाहतूक सुरु असते,खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघात झाले आहेत.
याच मार्गावर शाळा असल्याने विद्यार्थी व शिक्षक ये जा करताना जीव मुठीत धरून चालावे लागते, वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.
पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने खड्डे दिसत नाही व अपघात होत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्या कडे तातडीने लक्ष देऊन जिवघेणे खडे तात्काळ बुजवावे अशी मागणी केली जात आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये