ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुरामुळे झालेल्या पीक नुकसानी चे सर्वेक्षण केलेले पैसे कंपनीने तात्काळ दयावे

सर्वेक्षण केलेल्या सर्वेक्षकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा शेखर प्यारमवार

         माहे जुलै- ऑगस्ट २०२३ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे मोठे प्रमाणात भरपूर नुकसान झाले होते. त्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्ह्यात नियुक्त असलेलेली विमा कंपनी THE ORIENTAL INSURANCE COMPANY ने सर्वेक्षणाचे काम SURVEY VENDER म्हणून COUNCOURSE कंपनी ला दिलेले होते. त्यांचे मार्फतीने शेतपीकांच्या झालेल्या नुकसानाच्या सर्वेक्षणाचे काम जिल्ह्यातील स्थानिक मुलांनी पूर्ण करून दिलेले आहे. डिस्ट्रिक्ट मॅनेजर श्री. दत्ता राहसे यांनी १५ ते ३०दिवसात पैसे देऊ असे सांगितले होते परंतु आता ७ ते ८ महिने लोटूनही त्या सर्व्हेक्षक मुलांच्या कामाचे पैसे कंपनीने सर्वेक्षक मुलांना दिलेले नाहीत.

त्या करिता बहुदा श्री. दत्ता रहासे यांना सर्वेअर मुलांनी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केले असता त्यांनी असे सांगितले आहे कि, अद्याप THE ORIENTAL INSURANCE COMPANY कडून त्यांना पैसेच मिळालेले नाहीत. जर सर्वेक्षण केलेल्या सर्वेक्षक मुलांचे पैसे देण्यात इतक्या अडचणी येत असतील व एवढा कालावधी लागत असेल तर शेतकऱ्यांचा पीक नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना खरचं मिळणार काय अस प्रश्न सर्वेअर मुलांना व शेतकऱ्यांना निर्माण होतो आहे. सर्वेक्षक मुलांनी आपल्या जिव्हाची पर्वा न करता त्यांनी चिखलातून, पाऊसात, अवघड वाटेतुन प्रवास करीत थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्वे केलेले आहेत, आणि आता एवढा कालावधी लोटून सुद्धा त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला जात नसेल तर हा अन्याय त्यांच्यावरील अन्यायचं मानावा लागेल हे विशेष.

आम्ही सर्व सर्व्हेक्षक मुलांनी आपल्या जिव्हाची पर्वा न करता त्यांनी चिखलातून, पाऊसात, अवघड वाटेतुन प्रवास करीत थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्वे केलेले आहेत, परंतु याचा मोबदला/ पैसे आम्हला अजूनही मिळालेले नाही, कंपनीच्या पदाधिकारी सोबत बोलना केले असता १महिन्याच्या आत देऊ असे म्हटले पण आता ७-८ महिने लोटून सुद्धा पैसे मिळाले नाही, आम्हा सर्वांचे पैसे तात्काळ द्यावे अशी आमची मागणी आहे. – आदित्य निकोडे सर्वेक्षक

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये