ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संविधान मंदिराचे चंद्रपूरच्या शास. औ. प्र. संस्थेत उद्घाटन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

    संविधानाच्या जनजागृतीच्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालय येथे संविधान मंदिराची निर्मिती केलेली आहे . या मंदिराचे उद्घाटन आभासी पद्धतीने आज दुपारी 11.30 वाजता देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते मुंबईत झाले . तर चंद्रपूर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या या संविधान मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी संविधान अभ्यासक एड. कल्याण कुमार, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. विजया गेडाम, संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे, महिला औ. प्र. संस्थेच्या प्राचार्य कल्पना खोब्रागडे, डॉ. किरण पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी डॉ. गेडाम म्हणाल्या, संविधान आपले समतेने एकात्मतेने राहण्यास व कार्य करण्यास बाध्य करते. सर्व धर्म ग्रंथांचे मुल तत्व दिसून येते.

   एड. कल्याण कुमार म्हणाले की, देशातील सामान्य व्यक्तीला संविधानाची माहिती असली पाहिजे. संवैधानिक नैतिकता दैनंदिन व्यवहारात आली पाहिजे. एकंदरीत तो प्रत्येकाच्या अभ्यासाचा भाग झाला पाहिजे. म्हणूनच संविधान मंदिराची निर्मिती हा क्रांतिकारी उपक्रम असून यामुळे एक संविधानिक संस्कृती निर्माण होईल , असे मत त्यांनी व्यक्त केले. प्राचार्य वानखेडे यांनी संविधान मंदिर निर्मितीबाबत आलेले स्वानुभव कथन करून शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी बी. आर. बोढेकर यांनी केले तर संविधानाची उद्देशिकाचे वाचन गटनिदेशक जितेंद्र टोंगे यांनी केले. सूत्रसंचालन गटनिदेशिका सुचिता झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक एन.एन. गेडकर यांनी केले.

  या संस्थेत संविधान मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची आणि तंत्र माध्यमिक विद्यालय येथेही या मंदिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

       संविधान मंदिराचे उद्घाटन निमित्ताने संस्थेच्या इमारतीत विविध विषयांवर संविधान संबंधित रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यात संस्थेच्या प्रशिक्षणार्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये