ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरलीचे आकडे घेताना दोघांना पकडले 

दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 तालुक्यातील देऊळगाव मही येथे वरली जुगाराचे आकडे घेताना दोन जणांना पोलीस प्रशासनाने पकडले त्यांच्याकडून १० हजार ८४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी घडली

 सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील देऊळगाव मही येथे तमन्ना ऑटो इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियन च्या बाजूला दोन जण वरलीचे आकडे घेत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली, त्यावर घटनास्थळावर जाऊन पोलिसांनी आरोपी शेख इमरान नैनुमुद्दीन राहणार रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना हल्ली मुक्काम डिग्रस तालुका देऊळगाव राजा तसेच शेख इरफान शेख गुलाब नबी राहणार देऊळगाव राजा हे दोघेजण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सार्वजनिक ठिकाणी रोडवर लोकांकडून पैसे घेऊन त्या मोबदल्यात वरलीचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या मोबाईल व्हाट्सअप वर देत असल्याचे आढळले त्यांच्याकडून दहा हजार किमतीचा मोबाईल तसेच नगदी 840 रुपये असा एकूण दहा हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये पुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये