ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘द ब्रेड ऑफ लाईफ’ डाॅ. पांडुरंग खानखोजे- “द अनसंग हिरो” नाट्य प्रयोगाने जिंकली रसिकांची मने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : स्थानिक सत्यनारायण बजाज वाचनालय सभागृहात क्रांतिवीर तथा प्रसिद्ध कृषीतज्ञ डाॅ.पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या जीवनावर आधारित ‘द ब्रेड ऑफ लाईफ – डाॅ. पांडुरंग खानखोजे ‘द अनसंग हिरो’ या नाट्य प्रयोगाचे प्रभावी सादरीकरण 8 ऑगस्ट रोजी झालेले असून प्रयोगाने वर्धेकर रसिकाचे मने जिंकले.

नाट्य प्रयोगाच्या उदघाटन

प्रसंगी मंचावर अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझले अध्यक्ष स्थानी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक हरिश इथापे, 21 महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनचे कमाडंट कर्नल समिक घोष, सुनिल खानखोजे, प्रदीप खानखोजे व कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित उपक्रमांतर्गत मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशन, नागपूर यांनी मंगला सानप लिखीत व दिग्दर्शित ‘ब्रेड ऑफ लाईफ – डाॅ. पांडुरंग खानखोजे ‘द अनसंग हिरो’ या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.

आपली प्रतिक्रिया देताना अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझले म्हणाले ‘डाॅ. खानखोजे यांचे क्रांतिकारी जीवन व हरित क्रांतिचा प्रयोग केवळ दिड तासात सादर करण्याचे अत्यंत कठीण काम कलाकारांनी यशस्वी केले’ तर नाट्य दिग्दर्शक हरिश इथापे म्हणाले ‘डाॅ.पांडुरंग खानखोजे यांच्या जीवनाची झलक प्रयोगाच्या माध्यमातून सादर करून जागरूक नागरिकांच्या मनात जाज्वल्य देशाभिमान निर्माण करीत आहे’.

या नाट्य प्रयोगात पुष्पक भट, हर्षवर्धन देशमुख,कृष्णा लाटा, ऋतुराज वानखेडे, शुभम गौतम, अविनाश अरोरा, कुणाल टोंगे, शुभ्रा पाटील यांच्या समवेत 25 कलाकारांनी विविध भुमिका निभविल्या.

लोकमान्य टिळकांच्या गुरुमंत्राने भारावून डाॅ.पांडुरंग खानखोजे यांनी चिन, जपानमधील क्रांतिकारकांची मदत घेऊन ‘इंडियन इनडिपेंडनस लिग’, ‘आझाद-इ-हिन्द सेना’ स्थापन करून अमेरिकेच्या भुमीत ‘गदर’ पक्षाच्या स्थापनेत महत्वाची भुमीका वठवून पहील्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश भारतावर आक्रमण केले व ब्रिटिशांची झोप उडविली तर युद्धानंतर मेक्सिकोत हरितक्रांती घडवून आणली. त्यांचा 45 वर्षाचा क्रांतिकारी व कृषीतज्ञ म्हणून प्रवास नव्या पिढीकरीता प्रेरणादायक आहे.

सदर नाट्य प्रयोग पाहण्यासाठी एस.एस.एन.जे.महाविद्यालय देवळी व यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील एन.सी.सी.छात्र सैनिक, वर्धेतील सामाजिक कार्यकर्ते व रसिक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.

संचालन क्रांतिवीर डाॅ.पांडुरंग खानखोजे समितीचे सचिव कॅप्टन गुजरकर यांनी तर आभार डाॅ. खानखोजे यांचे नातू सुनिल खानखोजे यांनी मानले. यशस्वीतेकरिता वैशाली खानखोजे, वैशाली गुजरकर, अक्षय जबडे राखी खोडे, वैष्णवी शिरभाते, योगेश आदमने, आसीफ शेख, प्रा. मंगेश भोमले, सुनिल ढाले यांच्यासह एन.सी.सी.छात्र सैनिकांनी प्रयत्न केले.

नाट्यप्रयोग पाहण्यासाठी प्रामुख्याने मुरलीधर बेलखोडे, गौरीशंकर तिबडीवाल, राजु गोरडे, श्री. बावीस्कर सर, प्रा. दिनेश भगत, प्रा. मेघा फासगे, प्रा. भाग्यश्री गरूड, प्रा स्वाती अवचट, प्रा. रूपाली तडस उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये