ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयाची प्राची गेडाम (९२.२० टक्के) तालुक्यात प्रथम

नवभारत विद्यालयाची श्रावणी कोहळे(९१.४०%) तालुक्यातून द्वितीय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

प्रवीण आडेपवार विद्यालयाची धनश्री समर्थ तालुक्यात तृतीय (९१.००%)

     राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रूवारी – मार्च २०२३ च्या उन्हाळी ( दहावी) परिक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून विश्वशांती विद्यालयाची प्राची गुलाब गेडाम (९२.२०%) घेऊन तालुक्यात प्रथम,नवभारत विद्यालयाची श्रावणी कोहळे(९१.४०%) तर प्रवीणभाऊ आडेपवार विद्यालयाची धनश्री समर्थ तालुक्यात तृतीय(९१.००%),  घेऊन बाजी मारली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज रोजी उन्हाळी परीक्षा इय्यता १० वीचा निकाल घोषित केला.त्यात सावली तालुक्याचा एकूण निकाल ९४.५१ टक्के लागला असून सावली तालुक्यात इयत्ता दहावीचे २१ विद्यालये असून नवभारत विद्यालय व्याहाड बुजचा निकाल ९८.४०%, रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली ९६.१८%,जिल्हा परिषद हायस्कूल निमगाव १०० टक्के, विश्वशान्ति विद्यालय सावली ७९.७२टक्के,शरदचंद्र पवार विद्यालय ९६.८१%, विकास विद्यालय विहिरगाव १००%, ईदिरा गांधी विद्यालय पालेबारसा १००टक्के,संत गजानन विद्यालय पेढ़री ९८.१५%,भैयाजी पाटिल भांडेकर विद्यालय कापसी १००%, प्रवीनभाऊ आडेपवार विद्यालय निफद्रा ९७.६७% ,निकाल लागला असून उतीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करीत पुढील कार्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये