ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१८ वर्षाखालील पाल्यांना वाहन चालविण्यापासुन प्रतिबंध करण्यात यावे

जेणे करुन संभाव्य अपघात व जिवितहानी टाळणे शक्य होईल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ४ अंर्तगत १८ वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवु नये. १८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना मोटार सायकल / अथवा इतर वाहन चालविण्याची पालकांनी परवानगी दिल्यास मोटार वाहन कायदा १९८८ ची कलम १९९ (अ) अंर्तगत रुपये २५०००/- दंडाच्या शिक्षेची तरतुद असुन अशा मुलांना वयाच्या २५ वर्षा पर्यत लायसन्स देण्यापासुन प्रतिबंध करण्यात आलेले आहे.

तरी सर्व पालकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या १८ वर्षाखालील पाल्यांना वाहन चालविण्यापासुन प्रतिबंध करण्यात यावे. जेणे करुन संभाव्य अपघात व जिवितहानी टाळणे शक्य होईल. असे आवाहन मो. समीर मो. याकुब उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये