आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही/एड्स जनजागृती प्रभातफेरी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामान्य रुग्णालय येथे विद्यार्थ्यांनी एचआयव्ही/एड्स विषयक जनजागृतीची शपथ घेत प्रभातफेरी काढली.
सदर कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर तर प्रमुख अतिथी म्हणून समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य जयश्री कापसे गावंडे उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती गावंडे यांनी, युवकांनी एचआयव्ही/एड्सबाबत अचूक माहिती आत्मसात करून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. भास्कर सोनारकर यांनी युवकांच्या सहभागातून जनजागृतीची मशाल पेटली, तर एचआयव्ही विषयीचा गैरसमज दूर करून प्रतिबंधाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविता येईल, असे सांगितले.
कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी एचआयव्ही/एड्स विषयक शपथ घेतली. त्यानंतर सामान्य रुग्णालय येथून प्रभातफेरीला सुरुवात करण्यात आली. प्रभातफेरी जटपुरा गेट मार्गे वळण घेऊन आझाद बगीचा मार्गे पुन्हा सामान्य रुग्णालय येथे पोहोचली. यावेळी एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, सुरक्षित वर्तन, तपासणी आणि जनजागृतीविषयक संदेश देण्यात आले.
कार्यक्रमास प्रा. विश्वनाथ राठोड, प्रा. देवेंद्र बोरकुटे, निखिल खंडारे, परिचारिका माया आत्राम उज्वला सोयाम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, निरंजन मंगरूळकर यांच्यासह विद्यार्थी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमास एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, एआरटी केंद्र, संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था, नोबल शिक्षण संस्था, संबोधन ट्रस्ट, विहान संस्था, प्लॅन इंडिया संस्था, शासकीय नर्सिंग कॉलेज, प्रभादेवी नर्सिंग कॉलेज आणि सुशीलाबाई मामीडवार समाजकार्य महाविद्यालय यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सुमंत पानगंटीवार यांनी केले.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्ग तीन दिवसीय प्रशिक्षण : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासकीय सुविधा केंद्रात व हस्तक्षेप लक्षगट प्रकल्पामध्ये कार्यरत समुपदेशकांचे प्रशिक्षण 17 ते 19 ऑगस्टपर्यंत वन अकादमी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणात, समुपदेशन कला, प्रिटेस्ट समुपदेशन, पोस्ट टेस्ट समुपदेशन, समुपदेशनाच्या नवीन पद्धती शिकविण्यात येतील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सकडॉ. बंडू रामटेके, डॉ सुनील भोकरे, सहसंचालक डॉ. राहुल जाधव, प्रसाद संत, हेमंत भोसले, रतन गाढवे, सचिन जाधव, निरंजन मंगरूळकर, नासिमा शेख, देवेंद्र लांजे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमंत पानगंटीवार यांनी केले.



