गवराळा जगन्नाथ मंदिराला आमदार प्रतिभा धानोरकर यांची भेट
मंदिराच्या रूपरेषेविषयी केली चर्चा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील गवराळा येथील ताठे लेआउट येथे निर्माणाधीन असलेल्या जगन्नाथ बाबा मंदिरास आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भेट दिली. यावेळी मंदिर निर्माणाच्या भविष्यातील रूपरेषेविषयी मंडळाच्या सदस्यांशी विस्तृत चर्चा केली व भविष्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जय जगन्नाथ सेवानिवृत्त मित्र मंडळाचे अध्यक्ष लिमेश माणूसमारे यांनी भविष्यातील मंदिर निर्माण योजनेची व रूपरेषेविषयीची त्यांना माहिती दिली. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मंदिर निर्माण परिसराची पाहणी केली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सदर मित्र मंडळातर्फे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, पार्थ धानोरकर, काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, जय जगन्नाथ मित्र मंडळाचे लिमेश माणूसमारे, अरुण येरकडे, प्रभाकर निमकर, सूर्यभान परचाकेळ पांडुरंग कोयचाडे, विलास खापणे, महादेव डोंगे, शामराव खापणे, भाऊराव पोईनकर, विनोद सावनकर, दीपक बदखल, उमेश उरकुडे आदी उपस्थित होते.