ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदर्श किसान विद्यालय नारंडा येथे रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्ट च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक ॲपचे वितरण

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर

नारंडा, दिनांक 24 ऑक्टोंबर 2024 ला रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्ट च्या वतीने इयत्ता 10 मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या सर्व मुला मुलींना ऑनलाइन आयडियल स्टडी ॲप आकांशा चे मोफत वितरण करण्यात आले. यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री अविनाश गुरुमुखी सर तर प्रमुख अतिथी रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्ट सचिव रोटरीयन श्री मोरेश्वर झोडे सर व रोटरीयन श्री कुलकर्णी सर मंचावर उपस्थित होते.

सोबतच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री खामकर सर, शालेय मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री कु. मयुरी शेंडे वर्ग दहावीला शिकवणारे शिक्षक श्री मंगेश माडुरवार, श्री आशिष पिंपळशेंडे, श्री लोकेश फुलझले व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात द्वीपप्रज्वलाने करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री खामणकर सर यांनी केले. यानंतर रोटरीयन श्री झोडे सर यांनी आकांक्षा या प्रोजेक्ट विषय उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सदर आयडियल स्टडी ॲप ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे अभ्यास करताना फायदेशीर होईल याची माहिती दिली.

रोटरीयन कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना हा ॲप कशाप्रकारे कार्यान्वित होतो त्याची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना सांगितले. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सदर आयडियल स्टडी ॲपचे निशुल्क वितरण करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री गुरुमुखी सर यांनी विद्यालयामध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती मंचावरील उपस्थित अतिथींना दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री लोकेश फुलझले सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री मंगेश माडुरवार सर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये