ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा शहर हद्दीत स्विफ्ट डिझायर कारसह विदेशी दारुचा माल जप्त

एकूण 6 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

          दिनांक 01/04/2025 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, अभिषेक उर्फ टायगर संजय वाघ, वय 24 वर्षे रा. केळकरवाडी गोंड प्लॉट, वर्धा. हा त्याचे कारने अमरावती येथील वाईन गॅलरी बार येथून दारू साठा घेऊन वर्धा येथील सुदामपुरी परिसरात येत आहे अशा माहितीवरून त्याचेवर दारूबंदी कायद्यान्वये प्रो. रेड केला असता यांच्या ताब्यातून विदेशी दारू, बियरसह, स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 14 DX 1854 चारचाकी असा एकूण 6.94,800/- रुपये चा माल जप्त करून गाडी चालक व बारमालक यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, राहुल ईटेकर, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, अरविंद इंगोले, राहुल अधवाल सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये