Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदुर येथे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनी तसेच विज्ञान रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विज्ञान प्रदर्शनीकरिता 30 विद्यार्थ्यांनी आपले प्रतिकृती सादर केल्या तसेच 40 विद्यार्थीनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला या प्रदशनीचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम तसेच विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शैलेंद्र देव यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी उप प्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षिका सौ विना देशमुख उपस्थित होते ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका कु जुबेदा सय्यद तसेच सहाय्यक शिक्षक प्रशांत धाबेकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले पाहुण्यांनी फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

यशस्वितेसाठी सर्व विज्ञान शिक्षकानी परिश्रम घेतले. विज्ञान प्रदर्शनी मध्ये इयत्ता 5 ते 7 गटात अनुक्रमे प्रथम कु.अक्षरा कुमरे द्वितीय कु कार्तिकी ठमके तृतीय रुद्र मत्ते ,8 ते 10 गटात प्रथम सुरज राठोड द्वितीय उज्वल रॉय तृतीय कु अनुष्का सिरटकर,11 ते 12 गटात प्रथम कु अल्फिया पठाण द्वितीय पवन कन्नूरवार तृतीय कु अनुराधा गायकवाड तसेच विज्ञान रांगोळी स्पर्धेमध्ये 5 ते 7 या गटात कु प्रथम अमृता भटवलकर द्वितीय कु नेहा गौरकर कु मनस्वी परसुटकर 8 ते 10 गटात प्रथम कु कृतिका जाधव द्वितीय कु खुशाली गाताडे तृतीय कु श्रावणी भोयर यांचे क्रमांक आले, विज्ञान प्रदर्शनीचे परीक्षण प्रा.नितीन वाढई तसेच सहाय्यक शिक्षक श्री हरिहर खरवडे यांनी केले तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण कु जुबेदा सय्यद व सौ माधुरी मस्की यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये