Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक संघाची सभा संपन्न

या सभेला माजी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे 2023 पहिल्या सत्राची माझी विद्यार्थी व पालक सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.अशोक खोब्रागडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वीरेंद्र गड्डमवार,सचिव सुरज बोमावार, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य अंतबोध बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या वाटचालीत माजी विद्यार्थी आणि पालक यांची सहकार्य महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांचे अनुभव मार्गदर्शक स्वरूपाचे आहेत असे विचार याप्रसंगी डॉ. अशोक खोब्रागडे यांनी व्यक्त केले या सभेत माजी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयाच्या संदर्भात काही सूचना व मार्गदर्शन केले त्यांचा लाभ महाविद्यालयास नक्कीच होईल असा आशावाद प्राध्यापक विनोद बडवाईक यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे संचालन डॉ. रामचंद्र वासेकर तर आभार प्रा. साकेत बलमवार यांनी मानले.या सभेला माजी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये