ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात पहिल्यांदाच मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांचा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता ई-दरबारचे आयोजन

सदरचा अभिनव प्रयोग वर्धा जिल्ह्यातील पोलीस दलाकरीता पहिल्यांदाच आयोजित

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ३१.०७.२०२३ रोजी मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व शाखा येथील पोलीस अधिकारी / अंमलदार यांच्या अडचणी, तक्रारी, सुचना जाणून घेण्याकरीता व त्यांचे प्रभावी निरसन करण्याचे उद्देशाने ई-दरबाराचे आयोजन केले. सदरचा अभिनव प्रयोग वर्धा जिल्ह्यातील पोलीस दलाकरीता पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर ई- दरबारमध्ये जिल्ह्यातील पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी हिरीरीने भाग घेतला व आपल्या शंका व तक्रारी तसेच वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्रालयीन कर्मचारी यांचेकडून होत असलेल्या पोलीसांचे वैयक्तीक कामातील दिरंगाई बाबत माहिती पोलीस अधीक्षक साहेब यांना दिली. त्यामध्ये प्रामुख्याने मेडीकल बिल, पोलीस रहिवासी कॉर्टर मधील सुविधा, रखडलेली पदोन्नत्ती, रखडलेली वेतनवाढ, कुंटुंबियांच्या अडचणी असे अनेक मुद्दे निर्भिडपणे थेट पोलीस अधीक्षक साहेबांसमक्ष मांडले.

मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी शक्य त्या अनेक तक्रारींचे वेळेवरच संबंधित मंत्रालयीन कर्मचारी व पोलीस अधिकारी यांना सुचना देवून निरसन केले व उर्वरीत तक्रारींबाबत वरिष्ठ स्तरावर शिघ्रतेने पाठपुरावा करून लवकरच निरसन करण्याची ग्वाही दिलेली आहे.

सदर ई- दरबार पोलीस अधिकारी / अंमलदार यांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता सदरची सुनावणी दर महिन्यात घेवून पोलीस अधिकारी / अंमलदार यांचे सर्व प्रश्न निकाली लावण्यात येतील असे मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी मत व्यक्त केले आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन यांच्या ई-दरबार या अभिनव प्रयोगाबाबत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यात कुतूहल व्यक्त केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये