ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीस दलातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कर्तृत्ववान महिलांचा गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वर्धा पोलीस दलाच्या वतीने मंगळवार, ११ मार्च २०२६ रोजी पोलीस मुख्यालय येथील ‘आशीर्वाद लॉन’वर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कन्यांचा आणि महिला पोलीस अंमलदारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी डी. नंदिनी अग्रवाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) डॉ. वंदना कारखेले उपस्थित होत्या. डॉ. नंदिनी अग्रवाल यांनी आपल्या भाषणात महिलांच्या आरोग्याविषयी आणि सामाजिक सक्षमतेवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, “श्री ही कुटुंबाचा कणा आहे, तिने स्वतःच्या प्रकृतीकडे आणि प्रगतीकडे लक्ष दिल्यास समाज अधिक सुदृढ होईल. डॉ. वंदना कारखेले यांनी महिला सुरक्षा आणि कायद्याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी कोणत्याही संकटात न डगमगता पैवनि सामोरे जावे, पोलीस दल सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

गुणवंत महिलांचा सत्कार

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे समाजातील विविध स्तरांवर आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सत्कार, यामध्ये खालील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.अ.क्र. सत्कारमूर्तीचे नाव क्षेत्र/विशेष कामगिरी

१ कु. आर्या पंकज टाकोने (मैदानी स्पर्धा उत्कृष्ट धावक)

२ कु. ईश्वरी काळमेघ विशेष नैपुण्य (मैदानी स्पर्धा उत्कृष्ट धावक, स्विमिंग, राज्यस्तरीय स्पर्धेत पदक)

३ कु. राही कोरडे विशेष कामगिरी (वॉटर पोलो, राज्यस्तरीय स्पर्धेत पदक)

४ कु. आर्या कांचळे विशेष कामगिरी (नृत्य)

५. कु. तन्वी आमले विशेष कामगिरी, (सौन्दर्य स्पर्धेत)

महिला पोलीस अंमलदार आशा जनकवार यांनी महाराष्ट्रातील बगेवेगळया प्लॅटफॉर्म वर आयोजित सौन्दर्य स्पर्धेत प्राविण्य मिळविल्या बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ महिला अधिकारी, अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन पोलीस मुख्यालय वर्धा तर्फे चोख ठेवण्यात आले होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या सन्मानाचा हा सोहळा प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये