ताज्या घडामोडी

सोमेश्वर मंदिराच्या विकास व जीर्णोद्धारासाठी 2 कोटी 43 लक्ष रुपयांचा निधी मंजुर

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील शिवभक्तांसाठी आराध्य दैवत असलेल्या राजुरा येथील श्री क्षेत्र सोमेश्वर संस्थानचा विकास व्हावा, या राज्य संरक्षित स्मारकामध्ये सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून मंदिराच्या संवर्धनासाठी व सुविधांसाठी २ कोटी ४३ लक्ष ९७ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

नुकताच ना. मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी १४ कोटी ९३ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. राजुरा येथील ऐतिहासिक सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधीकडून सातत्याने मागणी होत होती, त्या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता आता त्याला मोठे यश प्राप्त झाले असून सोमेश्वर मंदिरासाठी २ कोटी ४३ लक्ष ९७ हजार निधी मंजूर झाला आहे .यामुळे मंदिराचे जतन व दुरुस्तीचे कामे गतीने पूर्ण होतील असा विश्वास वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भातील अध्यादेश नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकछत्र योजनेंतर्गत सोमेश्वर मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामांच्या अंदाजपत्रकास सांस्कृतिक कार्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमेश्वर मंदिराच्या जतन आणि दुरुस्तीचे काम तात्काळ होण्यासंदर्भातील कार्यवाही तत्काळ करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला केली होती. त्यानुसार शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

यामध्ये मंदिराचे जतन व दुरुस्ती करणे, दगडी सीमाभिंत बांधणे, जुन्या बांधकाम पृष्ठभागाची रासायनिक प्रक्रियेद्वारे स्वच्छता, झाडे- झुडुपे काढणे, ग्राऊंटींग करणे, लोखंडी ग्रील बसविणे, सूचना फलक, माहिती फलक आणि दिशादर्शक फलक बसविणे आदी कामे यामध्ये समाविष्ट आहेत. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वाचनपूर्ती केल्याबद्दल शिवशंभू महादेवाचे भक्तगण व परिसरातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये