ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार प्रतिभाताई धानोरकर मूल व पोंभुर्णा तालुक्यातील समस्यांच्या घेणार आढावा

उद्या २४ एप्रिल २०२५ रोजी उपविभागीय कार्यालय, मूल व पोंभुर्णा तालुका येथे जनता दरबार

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : मूल व पोंभुर्णा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांना या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे की, आपल्या भागातील महत्त्वपूर्ण समस्या व विकासकामांवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दिनांक २४ एप्रिल, २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता, जनता दरबार, उपविभागीय कार्यालय, मूल येथे आयोजित केली आहे. तसेच पोंभुर्णा येथील वन विभागाचे शासकीय विश्रामगृह येथे दुपारी ३ वाजता जनता दरबार होणार आहे. या बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या जनता दरबाराचा मुख्य उद्देश आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न, विकास योजनांमधील अडचणी आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेणे हा आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या माध्यमातून या समस्यांवर योग्य तोडगा काढण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी ही बैठक एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल.

आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणी, सार्वजनिक समस्या, विकासकामांसंबंधी आपले विचार आणि सूचना आपण या बैठकीत मांडू शकता. यासाठी, ज्या कार्यकर्त्यांना किंवा नागरिकांना आपल्या समस्या व सूचना बैठकीत मांडायच्या आहेत, त्यांनी कृपया आपल्या समस्यांचे लेखी निवेदन तयार करून सोबत आणावे. हे निवेदन उपविभागीय कार्यालयात सादर केले जाईल, ज्यामुळे त्यावर योग्य कार्यवाही करणे शक्य होईल.

आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, या महत्त्वपूर्ण जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपल्या सक्रिय सहभागातून लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकट करावे. आपली उपस्थिती आणि आपले विचार निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होईल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये