ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयात नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे राष्ट्रीय सेवा योजना व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश डोंगरे, मंडळ अधिकारी श्री. चव्हाण साहेब, नांदा येथील तलाठी श्री. विकास चिन्ने, बी. एल. ओ. श्री. गुप्ता, राठोड, देरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम डॉ. राजेश डोंगरे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मतदान करणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून, त्या अधिकाराचा योग्य उपयोग केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

मतदान करताना कोणत्याही आमिषाला बळी न पडता, निष्पक्ष मतदान करावे असे त्यांनी आव्हान केले. या नव मतदार नोंदणी शिबिरात 43 विद्यार्थ्यांनी नव मतदार म्हणून नोंदणी केली. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रफुल मुसळे, श्रीमती ननिता बुरान, शालिक कांबळे, सविन मडावी, प्रशांत नवले व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये