ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा येथे भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांची ९२ वी जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

      डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अतस्व समिती व ऑल इंडिया कौमी तंजीम यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे ११ वे राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांची ९२ वी जयंती येथील डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार ग.म. शेख हे होते.

     कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळाचे सेवा अधिकारी लक्ष्मण रावजी गमे , वाघ महाराज, रुपलाल कावडे, अंकुश आगलावे, झाडे, माजी कृषी अधिकारी खिरटकर, विनोद खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार तथा माजी नगरसेवक राजेंद्र मर्दाने प्रामुख्याने उपस्थित होते.

     झाडे म्हणाले की, एक गरीब परिवारातील मुलगा ते महान वैज्ञानिक आणि देशाचे राष्ट्रपती असा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे.

        राजेंद्र मर्दाने म्हणाले की, डॉ. कलाम यांचे विचार सर्वांनीच आत्मसात करणे गरजेचे आहे. छोटुभाई यांच्या पुढाकाराने डॉ.कलाम चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन खरंच कौतुकास्पद आहे.

    आपल्या अध्यक्षीय भाषणात शेख म्हणाले की, डॉ. कलाम यांची तत्वे आणि विचारांशी असलेली बांधीलकी अनेकांना प्रेरक आहे.

   याप्रसंगी खिरटकर, अधिवक्ता विनोद कुत्तरमारे, आगलावे यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

   सुरुवातीला मान्यवरांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या तैल चित्रावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपलाल कावडे यांनी केले तर आभार छोटुभाई शेख यांनी मानले.

  डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी ” एक शाम डॉ. कलाम साहब के नाम” तथा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रतिभाताई धानोरकर सामाजिक, राजकीय नेते रमेश राजूरकर, माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सागर वझे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, विनोद लोहकरे, सुरेश महाजन, प्रमोद वाभिटकर, महसूल विभागाचे अधिकारी उल्हास लोखंडे, विनोद खोब्रागडे, आत्राम ज्येष्ठ नागरिक संघाचे लक्ष्मण पराते, मारोतराव मगरे, पाल साहेब पत्रकार राजू कुकडे, प्रवीण गंधारे, मनोज ठाकरे, मयूर दसूडे, शुभम गवई, व तसेच विविध सामाजिक- राजकीय संघटनेचे पदाधिकारी इ.ची. उपस्थिती होती.

      याप्रसंगी मान्यवरांनी डॉ. कलाम साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          यावेळी समाजातील प्रमुख व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच उल्लेखनीय योगदानाबद्दल किशोरभाऊ चव्हाण पेंटर व गायक कलाकार रहमत बाबा यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑल इंडिया कौमी तंजीम व एपीजे अब्दुल कलाम उत्सव समितीचे शेख जैरुदीन छोटूभाई त्यांचे सहकारी मुन्नाभाई शेख, मम्मुभाई शेख ,मोहसीन भाई, पठाण, कासिफ भाई, शब्बीर भाई, ढोके, परचाके ,बांगडे , दशरथ शेडे, सचिन मेश्राम, कैसर शहा, बसीर शेख, विनोद सुरज आदींनी अथक परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये