ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निमणी येथे सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन

अखेर २ वर्षानंतर न्यायालयीन लढाई जिंकली ; ३५ लक्ष रुपयाने गावाच्या विकासात भर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

       कोरपना तालुक्यातील निमणी येथील २५१५ ग्रामविकास निधी अंतर्गत २० लक्ष रुपये कामाला दोन वर्षांपूर्वी युती सरकारने स्थगिती दिली होती परंतु आमदार सुभाष धोटे यांच्या अथक परिश्रमानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्याने राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन ६ जानेवारी रोज शनिवारला सायंकाळी ४ वाजता पार पडले.

     यावेळी संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष उमेश राजूरकर कनिष्ठ अभियंता हेमंत मानापुरे माजी सरपंच रमेश भोंगळे ग्रामपंचायत सदस्य अनिल कारेकर विलास कोंगरे गजानन गोबाडे सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ राजूरकर रामकृष्ण बंडेवार संतोष गारघाटे नीलकंठ देठे चंद्रशेखर ठवसे मनोज धोटे बंडू टेकाम देवानंद मडावी अमोल गौरकर आदी मान्यवर उपस्थित होते

      यावेळी आमदार सुभाष धोटे म्हणाले की बीजेपी सरकारने अनेक गावे विकासापासून दूर ठेवले होते अखेर ही दोन वर्षांची लढाई आम्ही न्यायालयात जिंकलो असून उच्च न्यायालयाने अनेक विकासकामांची स्थगिती उठविल्याने कामाला सुरुवात होऊन अनेक गावांचा विकास होणार आहेत त्यामध्ये निमणी गावाचा समावेश असून या गावासाठी भरभरून निधी दिला आहे २५/१५ निधी अंतर्गत २० लाख जनसुविधा १० लाख नक्षलग्रस्त निधी ५ लाख निमणी हिरापूर रोड १९७ लक्ष निमणी धूनकी रोड १९४ लक्ष निमणी येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व सिंचनासाठी ९६ लाख रुपयांचा गेटेड साठवण कोल्हापुरी बंधारा होणार आहे या अगोदर सुध्दा विकासाच्या दृष्टीने अनेक कामे झाली आहे आणि पुढेही कामे देत राहणार आहोत असे सांगितले यावेळी निमणी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये