ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर रेल्वे मार्गाचे काम संथगतीने!

खासदार नेतेनी लक्ष द्यावे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

चिमूर -गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधी खा अशोक नेते यांनी आपल्या १०वर्षाच्या कारकिर्दीत नागभीड -नागपूर नवीन मार्गाचे बांधकाम करताना विशेष लक्ष दिले असतें तर कदाचित हा मार्ग सुरु झाला असता मात्र याकडे जातीने लक्ष देण्याकरिता यांनी बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब यांना नागपूर जिल्ह्यातील महत्वाचा मार्ग समजून पूर्ण करून घेणे गरजेचे होते याचे उदाहरण म्हणजे उमरेड -नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे.

नागभीड -उमरेड लोहमार्ग आणि रस्ता अजूनही नूतनीकरण न झाल्याने वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. खासदार नेते यांनी रेल्वे बांधकाम होण्याकरिता विशेष प्रयत्न केले असतें तर नवीन मार्गाचे लोकार्पण करण्याची ही वेळ मिळाली असती. नागभीड रेल्वे स्थानक परिसरात जे काम सुरु आहे यावरून चार तें पुढचे पाच वर्षे काम होईल असे दिसत नाही. यामुळे पूर्व विदर्भाला विकास गंगेत वाहून घेण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेक प्रवाशी गाड्या बंद झाल्या असून त्या पुन्हा सुरु करून जनतेला सेवा देण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये