Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

सिंदेवाही आदिवासी सामाजिक मेळावा तथा सत्कार समारंभ

आज पंचायत समिती सभागृह येथे आदिवासी सामाजिक मेळावा

  • चांदा ब्लास्ट :

(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही-अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सिंदेवाही तालुक्याच्या वतीने दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोज रविवारला वेळ 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे आदिवासी सामाजिक मेळावा तथा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोद जी बोरीकर विदर्भ महासचिव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद असून कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. सचिन मडावी उप आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूर. प्रमुख अतिथी म्हणून सुरेश पेंदाम समाज कल्याण अधिकारी चंद्रपूर. भैय्याजी येरमे संचालक कौशल्य विकास रोजगार विभाग चंद्रपूर. प्रा. डॉ. प्रकाश शेडमाके भौतिकशास्त्र डीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर. दामोदर वाढवे.सारथी आदिवासी सेवक. राहुल परचाके उपविभागीय अभियंता. एडवोकेट हरीश गेडाम माजी सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर. नंदादीप मडावी सामाजिक कार्यकर्ते डोंगरगाव. प्रा. परशुराम उईके नवरगाव अशोक मेश्राम अप्पर पोलीस अधीक्षक सेवानिवृत्त प्रकाश मडावी शिंदेवाही प्रा डॉ स्नेहा वेलादी डॉ प्रा अनिता भल्लावी. निखिल कोल्हे सामाजिक कार्यकर्ते नागभीड कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष विजयकुमार सोयाम तालुका अध्यक्ष भारतीय आदिवासी विकास परिषद. प्रा. डॉ. विजयकुमार सिडाम. मधुकर मडावी माजी सभापती. अन्य मान्यवर कार्यक्रमाकरिता राहून मार्गदर्शन करणार आहेत. भानापूर ग्रामीण क्षेत्रातील मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातून आदिवासी समाजातील विदर्भामध्ये प्रथमच प्रिया यशवंत ताडाम समुद्रा पार भरारी केली. उच्च शिक्षणाकरिता क्यून मेरी विद्यापीठात लंडन येथे एलएलबी करिता निवड झाली. जिल्हा परिषद शाळा आसोला चक सावली तालुक्यातील असून. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या विद्यापीठांमध्ये एलएलबी चे शिक्षण केले त्याच लंडन विद्यापीठात प्रिया यशवंत ताडाम यांची निवड झाली. हे बाब समस्त आदिवासी समाजाकरिता अभिमान पात्र आहे. अक्षय उईके या तरुण उद्योगास दिल्लीच्या सात पर्यंत सोड्यात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले चंद्रपूर जिल्ह्यातील लागवड येथील वन उपजा पासून विविध पदार्थ बनवून त्याची विक्री करणे जवळपास 300 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले बनवलेले हे पदार्थ आरोग्यासाठी हित वाहक असून आजारपणावर गुणकारी आहेत शासनाकडून आयोजित केलेल्या विविध ठिकाणी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले असतात भारत सरकार या उपक्रमाची दखल घेतली असून दिल्ली मंत्रालय भारत सरकार सूक्ष्म लहू उद्योग माध्यम या विभागाने स्वातंत्र्य दिनानिमित्त सहभागी होण्याकरिता निमंत्रण दिले होते आदिवासी समाज जंगलव्यापी असून समाजामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार बहुसंख्येने आहेत‌. अक्षय उईके यांच्या कार्याची माहिती समाजाकरिता भावी व त्यातून समाजाच्या युवा तरुण पिढीला एक नवीन स्वयं आधार मिळावा याकरिता अक्षय उईके यांचे सत्कार करण्याचं परिषदेने ठरविले . मुकेश गेडाम तिची निवड सदस्य म्हणून महाराष्ट्र शासन रंगभूमी परी निरीक्षण मंडळ मुंबई येथे झाले सदर परिसर झाडीपट्टी असल्यामुळे या परिसरातील बहुसंख्य आदिवासी समाजातील नवयुवक जेष्ठ कलावंत या क्षेत्रातील जोडलेले आहेत तीनही तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा पण सत्कार करण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायक वातावरण निर्माण होण्याकरिता सिंदेवाही येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे संयोजक कैलास कुमरे जिल्हा संपर्कप्रमुख अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांनी केले आहे. कार्यक्रमाकरिता सहभागी व्हावे असे आव्हान वसंत सिडाम, भगवान मेश्राम ‌ संजूताई पेदाम, बाळकृष्ण गेडाम, लोकेश मडावी, कृष्णा मडावी. ओमकार कोवे ‌, अंकुश श्रीराम. मकरंद मडावी,चेतन तुमराम निखिल कोवे, वैभव मडावी माणिक पेदाम, अरविंद शिडाम. दशरथ मडावी, गणेश पेदाम. रमेश शिडाम केलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये