ताज्या घडामोडी

भाजपा नेते राहुल सराफ ह्यांना मातृशोक

बालाजी वॉर्ड येथील निवासस्थानाहुन दुपारी निघेल अंत्ययात्रा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा महामंत्री तथा लोकमान्य टिळक शिक्षण संस्थेचे विद्यमान सचिव राहुल सराफ ह्यांच्या मातोश्री कल्याणी एकनाथराव सराफ ह्यांचे दिर्घ आजाराने काल दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री 11:45 वाजताच्या दरम्यान वयाच्या 83 व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले.

स्व. कल्याणी सराफ ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तसेच प्रसिद्ध पतपुरवठादार स्व. एकनाथराव सराफ ह्यांच्या पत्नी होत्या. मागील वर्षभरापूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले होते हे विशेष.

त्यांची अंत्ययात्रा दुपारी 3:00 वाजता त्यांच्या बालाजी वॉर्ड येथिल निवासस्थानाहुन निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा राहुल, सुन राधा, मुलगी गायत्री, जावई, नातवंडे व इतर शोकाकुल आप्तपरिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये