Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

नोव्हेंबर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे येण्याची शक्यता

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

चांदा ब्लास्ट :

सांस्कृतिक खात्याचा मंत्री म्हणून मी स्वत: व या विभागाचे सचिव तथा भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी लंडन येथे 01 ऑक्टोबरला जात आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे येत्या नोव्हेंबर महिन्यात लंडन येथून भारतात येण्याची शक्यता आहे,अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
03 ऑक्टोबर रोजी लंडन येथे वाघनखे भारतात आणण्यासाठी एमओयू होणार आहे. त्यानंतर येत्या नोव्हेंबर महिन्यात वाघनखे भारतात येणार आहे.
लंडनचे पंतप्रधान सुनक यांना भेटण्यासाठी वेळ मागितला असल्याचे ते म्हणाले.

*दर्शनासाठी उपलब्ध होतील वाघनखे*

अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला होता. वाघनखांच्या सहायाने महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. तिच वाघनखे आता भारतात आणून येथील जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.वाघनखे आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सोबत राहतील.महाराष्ट्रात वाघनखे येताच एक मोठा सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.
*वाघनखे व जगदंब तलवार आमची आस्था*

हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे 350 वे वर्ष आहे.म्हणून विविध उपक्रम सांस्कृतिक विभागातर्फे राबविले जात आहेत.यात शिवाजी महाराजांची होण मुद्रा,टपाल तिकीट प्रकाशन,एक कोटी शुवभक्तांचे पोर्टल यांचेसह महाराजांची ती वाघनखे व जगदंब तलवार भारतात आणणे हे विषय आहेत.ब्रिटन मधून वाघनखे आणण्यासाठी जीआरही काढण्यात आला आहे.वाघनखे व जगदंब तलवार वस्तू नसून ती आमची आस्था आहे.वाघनखे अपार शक्ती निर्माण करेल.ती ऊर्जा घेऊन कार्य करू,असेही ना.मुनगंटीवार म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये