Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

वाघाच्या मृत्यूचे गुड उलगडले : विद्युत स्पर्शानेच वाघाचा मृत्यू

मारेकऱ्याला वन विभागाने घेतले ताब्यात

चांदा ब्लास्ट :
अतुल कोल्हे भद्रावती : –

काही दिवसांपूर्वी तालुक्यातील आष्टी काकडे येथील शेत शिवारात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. या वाघाच्या मृत्यूचे गुढ आता उलगडले असून या वाघाच्या 63 वर्षीय मारेकऱ्यास वन विभागाने ताब्यात घेतले आहे. मनोहर डोमा कुळमेथे, वय 63 वर्ष, राहणार आष्टी काकडे असे या आरोपीचे नाव आहे. सदर वाघ गावातील शिवारात मृता अवस्थेत आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. शव विच्छेदनानंतर या वाघाचा मृत्यू विद्युत करंट लागून झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर वनविभागाने या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर शेतात लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन या वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.आरोपीने आपल्या शेतात पिकांच्या संरक्षणासाठी तार लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता.या ताराचा स्पर्श होऊन वाघाचा मृत्यू झाला. सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर आरोपीने या वाघाचा मृतदेह शेतापासून दूर शिवारात नेऊन टाकला होता. या घटनेचा पुढील तपास वन विभाग करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये