ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विवेकानंद महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय खो – खो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे करण्यात आले. तालुकास्तरीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन कार्यक्रमात विवेकानंद महाविद्यालय भद्रावती चे उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, तसेच प्रमुख पाहुणे भद्रावती तालुका क्रीडा समितीचे सचिव, प्रकाश दरेकर, प्रा. मालेकर, प्राध्यापिका शेंडे, प्राध्यापिका रोडे, प्रा. चव्हाण, प्रा. लांबट, प्रा. कापगते, प्रा. डॉ. घुमे, प्रा, काकडे मान्यवर उपस्थित होते.

या क्रीडा स्पर्धेत भद्रावती तालुक्यातील मुला मुलींचे १९ वर्ष वयोगट खालील एकूण ६ संघ, १७ वयोगट खालील मुला मुलींचे १४ संघ आणि १४ वयोगट खालील मुला मुलींचे १४ संघ उपस्थित होते. ही स्पर्धा दिनांक ७ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२३ दरम्यान विवेकानंद महाविद्यालय भद्रावती च्या प्रांगणात होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन विवेकानंद महाविद्यालय भद्रावतीचे उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत १९ वर्ष वयोगटातील मुले विजेता संघ यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती आणि उपविजेता संघ विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती तसेच मुली विजेता संघ लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती आणि उपविजेता संघ विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती झाले. विजय संघ जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी जाणार आहे. विजयी आणि उपविजयी खेळाडूंचे आयोजका तर्फे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेकरता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये