ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्याहाड बुज येथे सुधिरभाऊ मुनगंटीवार यांची भेट

बस स्टॉप तसेच इतर प्रश्न सोडविण्यास असणार कठीबद्ध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे चंद्रपूर गडचिरोली दौरा करत असताना काही कार्यकर्त्यांनी सत्कार करण्यासाठी व्याहाड बुज बस स्थानक परिसरात उभे असलेल्या कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका मदतनीस ना बघुन दौरा थांबविण्यात आला असता त्यांच्या स्वागतासाठी फटाके फोडुन व पुष्प गुच्छ देवुन सत्कार करण्यात आले व विविध विषयांवरील माहिती देण्यात आली. त्यावेळी अत्यंत कमी वेळात संपुर्ण माहिती समजुन घेवुन सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे सांगण्यात आले.

त्यावेळी उपस्थित संतोष तगडपल्लीवार माजी बांधकाम सभापती जि प चद्रपुर,रवि बोलीवार मा उपसभापती प स सावली, सरपंच सौ कवीताताई बोलीवार, जितेश सोनटक्के उपसरपंच डोणाळा,राकेश गोलेपल्लीवार ग्रा प सदस्य जिबगांव, परशुराम भोयर,आदि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

व्याहाड बुज वासीयानी बसस्थानक जिर्ण अवस्थेत असल्याने नविन बसस्थानक साठी निधी देण्याची मागणी केली असताना सुधिर भाऊ मुनगंटीवार यांनी 25 लाख रुपये खर्च करून सुंदर असा बसस्थानक बनवले जाईल, अशी त्यावेळी माहिती देण्यात आली.तसेच सा. बा.विभाग अधिकारी यांना फोन द्वारे संपर्क करुन त्वरित बांधकाम करण्यासाठी निर्देश देण्यात आले. राकेश गोलेपल्लीवार जिबगांव यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगुन वाढिव घर मंजुर करुन ढिवर समाजाला दिलासा मिळावा याकरीता मागणी केली असता त्वरीत घरकुल मंजुर करण्यात येतील असेही आश्वासन व निर्देश देण्यात आले.त्यावेळी सुधिर भाऊ यांचे राकेश गोलेपल्लीवार ग्रा प सदस्य जिबगांव यांनी आभार मानले.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सुद्धा निवेदन दिले त्यावेळी त्यांच्या समस्या समजुन घेवुन आपन प्रश्न सोडविण्यासाठी कठीबद्द असल्याचे सांगितले त्यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये