सरकारी दवाखान्यातील मेल मेडिसीन वार्डातील लिफ्ट सहा महिन्यांपासून बंद
या गोष्टीमूळे रुग्णांचे जीव धोक्यात? ; याला जिम्मेदार कोण शासन की प्रशासन?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे
आज दिनांक रोजी एक रुग्ण आपल्या आरोग्याची तपासणी करण्याकरीता सामान्य रुग्णालय वर्धा येथे गेले असताना रुग्णाला भरती होण्यासाठी सांगितले असताना त्या रुग्णाला मेल मेडिसीन वार्ड येथे तिसऱ्या माळयावरील पाठविण्यात आले तो मेल मेडिसीन वार्डा मध्ये पोहचलो असताना वर जाण्यासाठी सहा महिन्यांपासून लिफ्ट पूर्णपणे बंद आहे तुम्हाला स्वतःला आपल्या जीव झोकून वर चढून जावे लागेल? जेव्हा की मेल मेडिकल वार्डा मध्ये महिलांचा डिल्लेव्यरी वार्ड आणि लहान मुलांचा सुध्दा वार्ड आहे. डिल्लेव्यरी वार्डा मध्ये गरोदर महिलेला पाय-या चढून जाणे व पाय-या उतरुन येणे अश्यावेळी पाय घसरुन पडला किंवा पडली तर जीव जाण्याची शक्यता आहे या गोष्टीचा जिम्मेदार कोण असणार शासन किंवा प्रशासन तर आमच्या प्रतिनिधीने डॉ प्रियंका चौधरी व निवासी आरोग्य अधिकारी डॉ प्रणय धमाणे यांनी सांगितले की आम्ही आमचं पत्र वर्धा बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभियंता सतीश अंभोरे यांना वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वान्यसी मॅडम यांना सुध्दा व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार नामदार डॉ पंकज भोयर यांना सुध्दा वांरवार पत्र दिलेले असून सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे तर या गोष्टीचा जिम्मेदार कोण असणार? शासन की प्रशासन?