ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गढपंढरवनी येथे जागतिक मासिक धर्म स्वच्छता दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड सिमेंट कंपनीच्या वतीने गढपंढरवनीमध्ये जागतिक मासिक धर्म स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला.

मासिक धर्म ही प्राकृतिक प्रकिया आहे जी महिलांच्या जीवनातील महत्वपूर्ण हिस्सा आहे आणि त्या विषयावर महिलांमध्ये जागरूकता असणे अत्यंत आवश्यक आहे..माणिकगढ कंपनी महिला साठी विविध कार्यक्रम आयोजित करत असते महिलाविषयक विशेष गोष्टी ध्यानात ठेवून महिलांना समाजामध्ये पुढे कसे आणता येईल यासाठी सतत प्रयत्नशील असते.

या कार्यक्रमाचे प्रमुख आणि मार्गदर्शक म्हणून छाया जोगदंडे लाभल्या. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत किशोरी मुलीना आनि स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात त्यांनी काय काळजी घ्यायची असते या संदर्भात माहिती दिली. महिलांना हिमोग्लोबीन वाढीसाठी औषधी आणि सॅनिटरि नॅपकीन वितरीत करण्यात आले. यावेळी 35 महिला उपस्थित होत्या.

गावातली महिला यांनी अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगढ कंपनीचे धन्यवाद मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये