आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

प्रलंबित समस्‍यांविरोधात आज “विमाशि संघा”चे धरणे आंदोलन

या आंदोलनात शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्‍थित राहण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट

प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ २४ मेला सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विषय सुचीतील सर्व प्रलंबित प्रकरणे १७ जूनपर्यंत निकाली काढण्यात येतील, असे मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी आश्वासीत केले होते. परंतू, त्यातील अनेक प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. व त्या सभेचे इतिवृत्तही अप्राप्त आहे. या गंभीर प्रस्तावांच्या निवारणार्थ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांच्‍या नेतृत्वात शुक्रवार दिनांक ०७ जुलै २०२३ ला दुपारी ३.०० ते ५.३० दरम्यान जि.प. चंद्रपूर समोर धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे.

या धरणे आंदोलनात शिक्षक – शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा थकबाकी हप्ता तात्‍काळ देण्यात यावा, सेवानिवृत्ती उपदानाची अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्यातील काही एक वर्षाहून अधिक कालावधी झाल्‍यामुळे पुर्नमान्‍यतेकरिता महालेखाकार यांचेकडे पाठवावी लागतात. अशा प्रकरणातील त्‍यांच्या देय रकमावरील व्‍याजाची वसुली संबंधित दोषी अधिकाऱ्यांकडून करण्यात यावी, ऑगस्‍ट २०२२ ला कॅम्पमध्ये सुमारे तिनशे निवडश्रेणी / वरिष्ट श्रेणी प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. परंतू त्यापैकी शेकडो प्रस्ताव अजुनही प्रलंबित आहेत ते तात्काळ निकाली काढण्यात यावे, मागील एक वर्षांपासून अनेक वैद्यकीय देयके प्रलंबित आहेत ते तात्काळ निकाली काढण्यात यावे, ज्या निवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमित पेंशन मंजूर झाले नाही अश्या निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना प्रोव्हीजनल पेंशन दिले जाते. त्यांचे बिल काढण्यात नियमितपणा दिसून येत नाही. काही निवृत्ती वेतनधारक सहा महिणे वेतनापासून वंचित राहतात असे निदर्शनास येत आहे, अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या किंवा काही शिक्षक कर्मचाऱ्यांना चुकीने अधिसंख्य दाखविण्यात येवून त्यांची वेतनवाढ किंवा सेवानिवृत्ती प्रकरणे रोखलेली आहेत. त्यांना त्यांचे लाभ तात्काळ अदा करण्यात यावे, अनुकंपा तत्वावरील पदभरतीचे मान्यता प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावे, विविध विषयावरील अनेक प्रस्ताव प्रलंबित असण्यामागे भ्रष्टाचार हे प्रमुख कारण आहे असे ऐकीवात आहे. त्याची सत्यता पडताळून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

या आंदोलनात शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्‍थित राहण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूरचे जिल्‍हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, म.रा.मा.शि.महामंडळाचे सहकार्यवाह जगदीश जुनगरी, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, विमाशिचे उपाध्यक्ष सुनील शेरकी, नामदेव ठेंगणे, गंगाधर कुनघाडकर, मंजुषा धाईत, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, सहकार्यवाह अनिल कंटीवार, शालीक ढोरे, नितीन जीवतोडे, सोनाली दांडेकर, वसुधा रायपुरे, दीपक धोपटे, मारोतराव अतकरे, प्रमोद कोंडलकर, देवराव निब्रड, श्रीराम भोयर, गुरुदास चौधरी, सचिन तपासे, मनोज वासाडे, रामदास आलेवार, धनंजय राऊत, रंजना किन्नाके, प्रा. ज्ञानेश्‍वर सोनकुसरे, प्रा. अनिल डहाके, प्रभाकर पारखी, आनंद चलाख यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये