ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायकल स्नेही मंडळाची जिल्हा कार्यकारीणी घोषित:अध्यक्ष प्रा. विलास पारखी तर सरचिटणीस उदय धकाते यांची निवड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

   सायकल चालवा, आरोग्यवान व्हा, प्रदूषण टाळा आणि पर्यावरण वाचवा या अनुषंगाने सन २०१८ पासून गडचिरोली जिल्ह्यात सायकल स्नेही मंडळाचे जनजागृतीपर कार्य सुरू आहे.

 परिश्रम भवनात मंडळाची विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे संस्थापक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रास्ताविक प्रा. विलासराव पारखी यांनी केले तर पत्रकार उदय धकाते यांनी आजवर झालेल्या उपक्रमावर प्रकाश टाकला. मंडळाचे वतीने शालेय विद्यार्थ्यांना सायकल चालवण्याचे महत्त्व समजावून सांगणे, मंडळाच्या तालुका स्तरावर शाखा स्थापन करणे, सायकल स्नेहीची संख्या वाढवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

शेवटी जिल्हा सायकल स्नेही मंडळाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आणि निवड झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. विलासराव पारखी, सरचिटणीस उदय धकाते, उपाध्यक्ष प्रा. सुनिता साळवे, उपाध्यक्ष उपेंद्र रोहणकर , सहसचिव सौ. योगिता दशमुखे, संघटक प्रा. अरूण पालारपवार तर सदस्य म्हणून सौ. सुचिता कामडी, मिरा चौधरी, सुचिता धकाते,  निलिमा देशमुख,विजय साळवे, प्रा. वासुदेव तलसे, मोहित दशमुखे यांची निवड करण्यात आली. सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. चंद्रकांत लेनगुरे आणि विलासराव निंबोरकर मंडळाचे सल्लागार म्हणून असणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये