ताज्या घडामोडी

907 किलो अंमली पदार्थ चंद्रपूर पोलिसांनी केले नष्ट – जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा

पथसंचलन करून केली जनजागृती

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

नशा मग ती कशाचीही असो जेव्हा तिचा अतिरेक होतो तेव्हा ती अत्यंत घातक ठरते. व्यसनाच्या अधिन झालेल्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तर दुष्परिणाम होतोच त्या सोबतच त्यांचे कुटुंबीय व समाजावर देखिल मोठे दुष्परिणाम होतात. हे व्यसन जर अंमली पदार्थांचे असेल तर सेवन करणाऱ्यासह कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य अंधकराच्या गर्तेत सापडते. अशा नशेच्या आहारी गेलेल्या लोकाचे जीवन वाचवणे, त्यांना व्यसनाधीनतेपासून बाहेर काढून त्यांचे आयुष्य सावरण्याचा उद्देशाने व  त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 26 जुन हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन पाळला जातो.

दिनांक 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्याने चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी ह्यांच्या मार्गदर्शनात सकाळी 07:00 ते 08:00 दरम्यान गांधी चौक ते पोलीस मुख्यालयापर्यंत पथसंचलन करुन जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मुख्य मार्गावर अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणामासंदर्भात स्लोगन, फलके, बॅनर, पोष्टर, होर्डींग द्वारे तसेच नागरीकांना पॉम्पलेट वाटुन जनजागृती करण्यात आली.

 

सदर प्रभात रैलीचा शुभारंभ शहर पोलीस स्टेशन जवळील गांधी चौकात जिल्हाधिकारी विनय गौडा, ह्यांनी जिल्हा  पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि महेश कोंडावार, पो.स्टे. चंद्रपूर शहर चे पोनि सतिश राजपुत, पोस्टे रामनगर चे पोनि राजेश मुळे, पोस्टे दुर्गापूर येथील पोनि अनिल जिट्टावार, शहर वाहतुक शाखेचे रोशन यादव, प्रविण पाटील, सपोनि श्री मिलींद पारडकर ह्यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून केला. पथसंचलनात  पोलीस अधिकारी तसेच सी-60 दंगा नियंत्रण पथक, वाहतुक शाखा, पोलीस मुख्यालय आणि पोस्टे चंद्रपूर शहर रामनगर, दुर्गापूर येथील महिला व पुरुष पोलीस अंमलदार मोठया संख्येने उपस्थित होते.

अमली पदार्थ नाश कारवाई

पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे “जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन जनजागृती प्रभारी रैलीचे समापन झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एनडीपीएस ॲक्ट अन्वये दाखल गुन्हयातील अंमली पदार्थ (गांजा, डोडा पावडर व टरफल) असा एकुण 906 किलो 962 ग्रॉम अमली पदार्थ हा मा. न्यायालयाचे परवानगीने पंचासमक्ष पोलीस मुख्यालय येथे जाळुन नष्ट करण्यात आला. ह्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय राधीका फडके, परि पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि महेश कोंडावार, ह्यांचेसाह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये