ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेगळ्या विदर्भासाठी ॲड.वामनराव चटप यांचे उपोषण

सास्ती - रामपूर टी पाॅईंटवर रास्ता रोको ; शेकडो नागरिक व महिलांचा स्वतंत्र विदर्भासाठी आक्रोश

चांदा ब्लास्ट

राजुरा तालुक्यातील सास्ती – रामपूर टी पाॅईंटवर आज दिनांक ३१ डिसेंबरला दुपारी एक वाजतापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष, अनेक पक्षांचे विदर्भवादी कार्यकर्ते आणि शेकडो रामपूर व सास्ती येथील नागरिक सहभागी झाले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवादी नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांचे पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला समर्थन देण्याकरिता सर्वत्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असुन राजुरा तालुक्यातील हे तिसरे रास्ता रोको आंदोलन आहे.

                 रामपूर – सास्ती टी पाॅईंट येथील रास्ता रोको मुळे शेकडो कोळसा वाहतूक करणा-या ट्रकांच्या तिन्ही बाजूने रांगा लागल्या. यावेळी या अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणी रास्ता रोकोमुळे संपुर्ण वाहतुक बराच काळ ठप्प होती. अखेर राजुरा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळा केला. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या, हे विशेष.

             या रास्ता रोको आंदोलनात बाजार समिती संचालक दिलीप देठे, प्रभाकर ढवस व प्रफुल्ल कावळे, योगेश करमनकर, सुभाष काटवले, एकनाथ पोटे, मारोती लांडे, सचिन कुडे, बापूजी साळवे, बळीराम खुजे, वासुदेव ताजने, चेतन बोभाटे, राहुल बानकर, शीतल बानकर, सुरज गव्हाणे, सिंधुबाई लांडे, अल्का मालेकर, किरण बावणे, मंदाबाई बानकर, शामराव काटवले, रंगराव कुलसंगे, रमेश गौरकर, विद्या अडबाले, सुवर्णा चटप, पौर्णिमा रामटेके, प्रभाकर लोहे, मारोती उरकुडे, आशुतोष चटप, भाऊराव बोबडे, विलास कोदिरपाल, मनोज अडबाले, वसंता भोयर, निखिल कावळे, किशोर ताजने, मारोती लांडे, रामकिशोर चौधरी, रमेश बोंडे, सुनील गौरकार, आशिष आकनूरवार, सुरज महाकुलकर, राज पाटील, भूषण लोहे, अतुल हिंगाने, वासुदेव हिंगाने, उत्पल गोरे, प्रशांत पारखी, विनायक महाकुलकर, बंडू देठे, पांडुरंग पोटे, किशोर देरकर, खुशाल अडवे, सुरज बोबडे, इस्माईल भाई, रोशन कावळे, देवानंद भेंडारकर, नरेंद्र मोहारे, साईनाथ पिंपळशेंडे, कपिल इद्दे, शेषराव बोनडे, राजू पाहानपटे, मायाताई देठे, उज्वला नळे, सुनीता येरणे, ज्योती मोहितकर, सुमन कावळे, गजानन बोबडे, निखिल पोटे, रुखमाबाई कोडापे, कांता आत्राम, पुष्पा पोटे, मारोती लांडे,मंदा उपरीकर, सत्यशीला वाढई, शुभम आस्वले, मधुकर चिंचोलकर, इर्शाद शेख, ग्रा.पं.सदस्य अतुल खनके, मनोज सीडाम, बंडू डोंगे, प्रभाकर लडके, हेमराज हिंगाने, मनोज आत्राम, अंजना गौरकर, कासूबाई रोगे, मंदा ठाकरे, माया कामलवार, सागर तोटावार, राजेश लांडे, विशाल लांडे, कुसुम लडके, बहिणाबाई पारशिवें, समुद्रा कोडापे, गयाबाई उरकुडे, सखुबाई पाल, कांता आत्राम, शशिकला बोबडे यांचेसह परिसरातील अनेक ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, माजी सरपंच आणि रामपूर व सास्ती येथील नागरिक व महिला सहभागी झाल्या. आंदोलनात स्थळी राजुरा ठाणेदार योगेश्वर पारधी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये