ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आकांक्षा कराळे चे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बॅडमिंटन या खेळात प्रविण्य संपादित करुन अमरावती विद्यापीठात कलर कोट प्राप्त केलेली बी. एस सी फायनल ची विद्यार्थिनी आकांक्षा कराळे ही प्रभात किड्स अकोला ची माजी विध्यार्थीनी आहे. त्याबद्दल प्रभात किड्स येथे संस्था अध्यक्ष डॉ. गजाननराव नारे, वंदनाताई नारे यांचे हस्ते पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन तिला सन्मानित करण्यात आले. या वेळी शिक्षक, विध्यार्थी, उपस्थित होते.
आकांक्षा ने आपल्या भाषणातून क्रिडेतील यशाबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. आकांक्षा ही राहुल कराळे, सौ. वैशाली कराळे यांची मुलगी तसेच जे. टी. कराळे, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष पाथ्रीकर यांची नात आहे.