देऊळगाव राजा येथे पलभटी देवी उत्सव संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील शंकर प्रासादिक तुरीवाले मंडळ यांचा पलघटी देवी उत्सव प्रतिकात्मक कागदी दैत्त्याचे वध करून संपन्न झाला . .ग्रामदैवत श्री बालाजी मंदिरासमोर हजा रो भक्तांनी घेतला पलभटी देवी दैत्य वध व उत्सवाचा लाभ
देऊळगाव राजा शहरांमधील ३५० वर्षाची परंपरा असलेला पलभटी देवी उत्सव हजारो भक्तांच्या साक्षीने संपन्न झाला . जुना जालना रोड येथील विठ्ठल मंदिर येथून रात्री बारा वाजता पलभरी देवीचे सोंग निघाले . जुन्या वहिवाटी वरून हे सॉंग वाजत गाजत निघाले . .जागोजागी सुवासिनी यांनी देवीचे औक्षण करून ओटी भरली . चतुश्रृंगी देवी येथे महाआरती करण्यात आली .रात्री तीन वाजता शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी मंदिरासमोर देवीला प्रतिकात्मक कागदी दैत्य दाखवण्यात आला . या दैत्याचे वध देवीने केले . यावेळेस मंदिरासमोर हजारोच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते . . दैत्य वध झाल्यानंतर पारंपारिक वहिवाटेवरून सकाळी सूर्योदयो सात वाजता विठ्ठल मंदिर येथे देवीचे सोंग उतरवण्यात आले .यावेळेस उपस्थित महिला भक्तांना ओटी देण्यात आली . रात्रभर देवीसोबत भक्तगण मिरवणुकीत सहभागी झाले होते.
सदर पलभटी देवी उत्सवाचे आयोजन शंकर प्रासादिक तुरेवाले पंच मंडळ करतात . मागील ३५० वर्षापासून ही परंपरा देऊळगावकर भक्तीमय वातावरणात जोपासत आहे