गोवा येथे आयोजित राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गडचांदुरची चमू विजयी.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महाराष्ट्र वॉरियर्स च्या व्हॉलीबॉल चमू ने नुकत्याच भंडारा येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन विजय मिळवून गोवा येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावर प्रवेश मिळविला व विजय प्राप्त करून गडचांदुर शहराचे नावलौकिक केले आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल राजुरा क्षेत्राचे आमदार देवरावभाऊ भोंगळे यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ व रोख रक्कम 5000/ देऊन सत्कार व अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र वॉरियर्स च्या टीम मध्ये आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल चे विद्यार्थी निमिष उद्धव पुरी,नैतिक नितीन कल्लेवार , सुशांत संपत रापोलु ,
कृणाल बाबुराव लांजे,
अतुल नंदलाल चौधरी,
आर्यन संजय कुलमेथे,
मंथन श्रीकांत चिव्हाने,
अनिरुद्ध नवनाथ मंदे, ,साकिब कुरेशी ,हर्षित संकल्प बोबडे, प्रीत मंदे,यांचा समावेश आहे. वरील सर्व टीम चे भाजपचे शहराध्यक्ष अरुण डोहे,सतीश उपलेंचवार, उद्धव पुरी, डॉ सुभाष चुन्ने, व्यापारी असोसिएशन यांनी अभिनंदन केले आहे तसेच गडचांदुर शहराचे नाव लौकिक केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.