ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शासन निर्णयाची पायमल्ली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

नगरपंचायत कार्यालय द्वारा घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी निविदा काढून अटी व नियमाप्रमाणे घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राट देण्यात येते मागील वर्षी कंत्राट संपल्याने वर्तमानपत्रात जाहिरात दिनांक 26/7/ 23 ला ई निविदा मागण्यात आली होती त्यानुसार चार निविदा प्राप्त झाले त्यानुसार दिनांक २१/८/२०२३ ला निविदा उघडण्यात आलेली होती.

त्यानंतर लिफाफा मध्ये एक निविदाधारक काही कागदपत्रे नसल्यामुळे त्याला बाद करण्यात आलेले होते त्यापैकी तीन निविदा स्टैंड करण्यात आलेल्या होत्या त्यानंतर फायनान्शिअल बीड उघडण्यात आली त्यामध्ये एल- एक म्हणून भगत प्लास्टिक बल्लारपूर यांना कमी दराने काम झालेला आहे चौकशी केल्यानंतर 17.99% सर्वात कमी दर भगत प्लास्टिक बल्लारपूरचे असल्यामुळे त्यांना काम मिळालेला आहे पण शासन परिपत्रक क्रमांक सीएसटी/ 2017 / प्र. क्र.०८/एमा -२ मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक 26 नोवेंबर 2018 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रथम न्यूनतम देकर सादर करणाऱ्या एल- एक निविदा धारकाने अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम आठ दिवसाच्या आत संबंधित विभागाकडे जमा करण्याबाबतच्या अटीचा समावेश आहे ही आठ दिवसाची मुदत कोणत्याही कारणासाठी क्षिति लक्षम असणार नाही.

त्यामुळे अशा प्रकरणात नगरपंचायत सावलीने अगोदरची आठ दिवसाची मुदत दिल्यानंतर त्या निविदा धारकाला म्हणजेच एल- एक ला रिजेक्ट करून एल -२ व एल -३यांना पाचरण करायला पाहिजे होते पण असं काही न करता संबंधित विभागाच्या विभाग प्रमुख व मुख्याधिकारी नगरपंचायत सावली यांनी दिनांक २२/८/२३ जावक क्रमांक ५४६ नुसार पत्र दिले परंतु आठ दिवसाची मुदत असतानाही अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरलेली नाही याबातीतील माहिती संबंधित विभाग प्रमुख यांनी देण्यास टाळाटाळ करत लेखी पत्र द्या तरच माहिती देतो असे सांगत माहिती दिली नाही एकच्या बाजूने निर्णय घेऊन पुन्हा त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे मुदतवाढ देताना कमिटीची सभा मंजुरीघेऊन मुदत वाढ देणे अपेक्षित होते परंतु तसे काहीही केलेले नाही त्याचा अर्थ असा होतो की शासन निर्णय असताना या अधिकाऱ्यांनी शासन निर्णयाचे पायमल्ली करून शासननिर्णयाच्या विरोधात कारभार करणे म्हणजेच संबंधित विभागाच्या विभाग प्रमुख व मुख्याधिकारी यांच्याच मनमानी कारभार सुरू आहे असे दिसते त्यामुळे तीव्र नाराजी पसरलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये