चांदाब्लास्ट विशेष

बल्लारपूर पेपर मिलच्या कर्मचार्‍यांना मिळणार साडे दहा कोटींची थकबाकी – 3500 कामगारांच्या पगारात होणार मोठी वाढ

बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा व बिल्ट व्यवस्थापनात त्रैवार्षिक वेतन करार

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी 

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

देशातच नव्हे तर, संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे एकीकडे उद्योग ऑक्सिजन’ वर आहे व अनेकांना नौकरी गमवावी लागली. तर काहींना वेतन कपातीचा संकट आले, कोरोना काळात संपूर्ण देशात लाकडाऊन होते या काळात सुध्दा माजी खा. व जेष्ठ कामगार नेते नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात बल्लारपूर पेपर मिल कामगारांना त्रैवार्षिक वेतन करार करण्यात आला आहे.

जेष्ठ कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया अध्यक्ष बि.पी.एम. मजदूर सभा, बल्लारपूर यांच्या अध्यक्षतेखाली बल्लारपूर पेपर मिल बंगला येथे 15 सप्टेंबर 2021 रोज बुधवारला 2020-2023 ह्या कालावधीसाठी त्रैवार्षिक वेतन करार करण्याच्या संदर्भात झालेल्या चर्चेत बल्लारपूर प्रबंधनाचे सि. ओ. ओ.  निहार अग्रवाल, युनिट हेड उदयजी कुकडे, एच. आर. उपाध्यक्ष रण अब्राहम, जि. एम. एच. आर. प्रविन शंकेर, डि.जि.एम. एच. आर. अजय दुरागकर, युनियन चे महासचिव वसंतराव मांढरे, उपाध्यक्ष तारासिंग कलसी, कोषाध्यक्ष रामदास वाग्दरकर, सहसचिव विरेंद्र आर्य, सहसचिव सुभाष माथनकर, संघटन सचिव अनील तुंगीडवार, गजानन दिवसे, आषिश मोहता, के. व्हि. रेड्डी,  राजेन्द्र शुक्ला, सुदर्शन पुली, ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगारांच्या हक्कासाठी यशस्वी चर्चा करण्यात आली. 

या त्रैवार्षिक करारात 788 स्थायी कामगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वाढ मिळून किमान रु. 3972 व कमाल रु. 5080 रुपयांची वेतनवाढ करण्यात आली. 102 रोजंदारी कामगारास व 2527 कंत्राटी कामगार अशा एकूण 2629 कामगारांना पहिल्या दुस-या व तिस-या वर्षी अनुक्रमे 45, 47.50 व 50 रुपये ह्याप्रमाणे प्रतिदिवशी वेतनात वाढ करण्यात करण्यात येणार असल्याचे मान्य करण्यात आले.

त्याचप्रमाणे स्थायी कामगारांना वेतनाची मागील 15 महिन्याची थकबाकी रुपये 5,15,70,660/- रुपये (पाच कोटी पंधरा लाख सत्तर हजार, सहाशे साठ रुपये) अदा करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच कंत्राटी कामगारांना रु. 5,27,76,270/- (पाच कोटी सत्ताविस लाख छहात्तर हजार (सत्तर रुपये) अशी एकुण रु. 10,43,46,930 रुपये दहा करोड त्रेचाळीस लाख छेचाळीस हजार नवशे तीस रुपये) लवकरच देण्यात येणार आहे. 

ह्याशिवाय कामगारांच्या हिताचा अनेक मागण्या मान्य करून घेण्यात जेष्ठ कामगार नेते तथा माजी खा. नरेश पुगलिया ह्यांना यश मिळाले असुन झालेल्या व्यवस्थापनाशी झालेल्या करारानुसार खालील मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मुलीच्या लग्नाकरीता रुपये 75,000/- कर्ज  स्वरूपात देण्यात येईल.

कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी 16 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे मान्य करण्यात आले.

कन्या समृद्धी योजने अंतर्गत 10,000/- प्रबंधन व 10,000/- रुपये फिक्स बचत करण्याचे ठरले.

कामगार अपघात विमा मर्यादा रुपये 5 लाख वरुन रुपये 7 लाख करण्यात आले.

कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेल्या कामगारांना आर्थिक मदत देण्याचे ठरले.

या घोषणेने सर्व कामगारात उत्साहाचे वातावरण आहे. सायं. 7.30 व सकाळी 9.00 वाजता फटाके वाजवून पेढे वाटप करून आनंद व्यक्त केले.

सर्व कामगारांनी युनियन चे अध्यक्ष माजी खासदार मा. श्री नरेशबाबु पुगलिया यांचे आभार मानले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button