चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

यंग चांदा ब्रिगेडच्या ट्रक – चालक मालक ट्रांसपोर्ट युनियनचे काम बंद आंदोलन – आंदोलनाचा दुसरा दिवस

स्थानिक ट्रक चालकांना काम देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

वेकोलि मध्ये स्थानिक पल्ला गाडी चालक मालकांना डावलून परप्रांतीय ट्रक मालकांना कोळसा वाहतूकीचे काम दिल्या जात आहे. त्यामूळे या विरोधात आता यंग चांदा ब्रिगेडच्या ट्रक – चालक मालक ट्रांसपोर्ट युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून आज युनियनच्या वतीने नायगाव कोळसा खानिच्या चेकपोस्ट जवळ धरणे आंदोलन केले.

यावेळी युनियचे अध्यक्ष सय्यद अबरार, राजिव शेख, मोसीम खान, सलीम शेख, बबलू सिध्दीकी, सोहेल शेख, सानू शेख, कलीम खान, मोहम्मद हनिब शेख, सुनिल यादव, मुन्ना खान, इब्राईम खान, अकबर शेख, राहूल यदवंशी, उमेश गुप्ता, सुनिल चिल्का आदिंची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रवीश सिंह यांची आंदोलनाला भेट देत आपला पांठिबा दिला आहे.

जिल्ह्यात कोळशाच्या वाहतुकीसाठी योग्य अशा सर्व प्रकारच्या ट्रक आणि मशनरींची उपलब्धता आहे. असे असतानाही वेकोली प्रशासन तर्फे  खाजगी कंपनी आणि कंत्राटदारांना कोळसा वाहतूकीचे कामे  दिले जाते. सदर कंपणी आणि कंत्राटदार स्थानिक ट्रक चालकांकडे दुर्लक्ष करून इतर प्रांत, जिल्हा आणि राज्यातील ट्रक चालकांना कोळसा मालवाहतूकीचे काम देतात. यामुळे स्थानिक ट्रक चालकांना येथे काम मिळवणे कठीण होत आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामूळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यातच आता वेकोलि अंतर्गत मिळणा-या कामांवरही परप्रांतीयांनी डल्ला मारल्याने स्थानिक ट्रक चालकांपूढे मोठे आर्थिक संकट उभे झाले आहे. त्यामूळे डब्ल्यूसीएल-अधीनस्थ कोळसा वाहक आणि कंत्राटदारांना इतर राज्य आणि प्रांतातील ट्रक चालकांना काम देण्यापासून रोखून, फक्त स्थानिक ट्रक चालकांना त्यांच्या करार केलेल्या मालवाहू कामापैकी किमान 70 टक्के स्थानिक ट्रक चालकांना वाटप करण्यात यावे या मागणी करीता सदर काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button