ताज्या घडामोडी

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान तत्काळ द्या – समीर केणे ह्यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर बल्लारपूर

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान जून महिन्यापासून थकीत आहे ते अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नसून गोरगरीब, वृद्ध, अपंग, निराधारांचे देय असलेलं अनुदान तात्काळ देण्यात यावं अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष समीर केने यांच्या नेतृत्वात सर्व समिती सदस्यांनी केली आहे.

सदर अनुदान हे एकूणच महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांचे थकीत असल्याची माहिती आहे अशात महाराष्ट्रातील लक्षावधी लाभार्थ्यांना अद्यापही अनुदान मिळालं नसल्याने सर्व लाभार्थ्यांची गैरसोय होत असून यावर शासनाने गंभीरतेने लक्ष घालून तात्काळ देय असलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्याची माहिती देण्यात आली. विषयाची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी संबंधित खात्याच्या मंत्रालयात सूचना केल्या असून सदर अनुदान लवकरात लवकर लाभार्थ्यांना मिळेल याबाबत आश्वस्त केले आहे.

संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने तहसीलदार डॉ. कांचन जगताप यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे महामंत्री मनीष पांडे संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य राजेश दासरवार किशोर मोहुरले मल्लेश कोडारी सतीश कनकम श्रीनिवास कंदकुरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये