ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अण्णाभाऊ साठेंनी साहित्यातून समाज परिवर्तनाचे विचार मांडले – आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगांव राजा : एक तेजस्वी समृद्ध व्यक्तिमत्व जगतविख्यात साहित्यिक डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आपल्या साहित्यातून समाज परिवर्तनाचे विचार मांडले असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी स्थानिक श्रावणी लॉन्स येथे आयोजित जिल्हास्तरीय लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती उत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी केले.

या कार्यक्रमाचे उदघाट्क आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे होते तर अध्यक्ष मातंग समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तम मिसाळ, तर प्रमुख वक्ते म्हणून मातंग समाज अन्याय निवारण समिती प्रवक्ते विलास साबळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशउपाध्यक्षा सविता मुंढे,लहुशस्त्र सेनेचे संजूबाबा गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष सचिन क्षिरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड, नाझेर काझी, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख छगनदादा मेहत्रे,शाहू फुले आंबेडकर विचार मंच अध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके, सभापती समाधान शिंगणे,काँग्रेसचे मनोज कायंदे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, गजानन पवार,गणेश सवडे,भाई दिलीप खरात,किशोर कांबळे, गजानन काकड, अरविंद खांडेभराड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलतांना माजी मंत्री तथा आमदार डॉ. शिंगणे म्हणाले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी शोषित, वंचित,कष्टकरी,कामगार त्याचबरोबर पीडितांच्या लढ्यासाठी संघर्षमय लढा दिला.मातंग समाजातील सुशिक्षित तरुण युवकांनी आता कुठलेही हेवे दावे न ठेवता तालुका, जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर समाजात मोठ्या प्रमाणात संघटन मजबूत करून मातंग समाजाच्या प्रलंबित आरक्षणाचा प्रश्न सत्तेत असलेल्या सरकारला सोडवण्यासाठी भाग पाडले पाहिजे असे बोलतांना सांगितले. यावेळी प्रमुख प्रवक्ते अँड विलास साबळे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, राजकीय क्षेत्रात मातंग समाजाच्या लोकसंख्येनुसार समाजातील चांगल्या चेहऱ्यांना या राज्यकर्त्यांनी संधी दिली पाहिजे. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. मातंग समाजावर होणारे अन्याय हे आता थांबले पाहिजेत.

यासाठी समाजाने देखील एकजुटीने राहून आपली ताकद दाखवली पाहिजे असे आव्हान देखील त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचा महिला प्रदेश उपाध्यक्षा सविता मुंढे,छगन दादा मेहत्रे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप पाटोळे यांनी तर सूत्रसंचालन राजू गोफणे तर आभार संतोष जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महादेव गवळी,अश्विन गायकवाड,सुनील लोखंडे,लक्ष्मण निकाळजे,रघु निकाळजे, सुरेश खंदारे,श्रीराम बोरकर, ज्ञानेश्वर नाडे,राजू अवसरमोल,अरुण तौर,किशोर साळवे,लक्ष्मण उकंडे, सतिष कांबळे,देवानंद धोंगडे,बाळासाहेब गायकवाड, गजानन गायकवाड, छगन निकाळजे,व समाज बांधवानी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये