ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यातील एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या युवासेनेची हक्कासाठी भूमिका

शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी या करिता शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      चंद्रपूर जिल्ह्यातील एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, या ठाम मागणीसाठी युवासेना जिल्हाप्रमुख आलेख भाऊ रट्टे यांच्या मार्गदर्शनात व युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांच्या नेतृत्वात, शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे शिक्षणमंत्री तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते मा. दादा भुसे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.

जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजना कागदोपत्री मिळत असल्या, तरी प्रत्यक्षात त्या वेळेवर आणि पूर्ण लाभ देण्यात येत नसल्याचे वास्तव या निवेदनातून अधोरेखित करण्यात आले.

या निवेदनात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणात होणारा विलंब तात्काळ थांबवावा, जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांची दयनीय अवस्था तातडीने सुधारावी, ग्रामीण व आदिवासी भागातील रिक्त शिक्षक पदे त्वरित भरावीत, मागास भागांमध्ये डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, एससी-एसटी-ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे व कौशल्य विकास उपक्रम सुरू करावेत अश्या ठळक मागण्या करण्यात आल्या आहे.

युवासेनेच्या या निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक हक्कांसाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली.

युवासेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “शिक्षण हक्क आहे, उपकार नाही; आणि हा हक्क वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवासेना रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही!” यावेळी युवासेना विधानसभा समन्वयक मुनेश्वर बदखल, वरोरा तालुका अध्यक्ष प्रणव पारेलवार, युवा शिवसैनिक पीयुष सिंग, विपुल तिवारी, निखिल मांडवकर, अभिजित थाडुरी, राज चव्हाण, संदीप चटपकर, रवी ढवस उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये