ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होय…आम्ही पदवीधर होणार! गोंडवाना विद्यापीठाचा ‘विद्यापीठ आपल्या गावी’ उपक्रम

जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे पदवी अभ्यासक्रमाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

उच्च शिक्षणातील वाढती विद्यार्थी संख्येची गळती आणि सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विवंचनेमुळे उच्च शिक्षणापासून वंचित असणाऱ्या आणि उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या युवकांना त्यांच्या गावातच उच्च शिक्षण प्राप्त होणार असून गोंडवाना विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ आपल्या गावी’ या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या पदवी अभ्यासक्रमातून विविध रोजगारांची संधी प्राप्त होईल असा विश्वास गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या आदर्श पदवी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामपंचायत बिबी व शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यापीठ आपल्या गावी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या वर्गाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी टेकाम उपस्थित होत्या. यावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.संजय गोरे, विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वले, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे व डॉ. चंद्रमौली, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, डॉ.नरेश मडावी, डॉ.माने यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू पुढे म्हणाले या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या युवकांच्या व युवतींच्या अंगभूत कौशल्यांचा विकास होणार असून त्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण प्राप्त होऊन त्यातून त्यांना पदवी आणि रोजगार प्राप्त होईल व त्यांचे सक्षमीकरण होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन विद्यापीठाने दिलेला अभ्यासक्रम आम्ही शंभर टक्के यशस्वी करून दाखवू असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय गोरे यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.डॉ. शरद बेलोरकर यांनी केले. यावेळी यावेळी स्मार्ट ग्राम बिबी येथील ग्रामपंचायतचे सदस्य, अभ्यासक्रमाला प्रवेशित असणारे सर्व विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये